वडगावमध्ये “आत्मा’अंतर्गत शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा

बेल्हे- सोयाबीनच्या भरघोस उत्पादनासाठी एकात्मिक कीडरोग व्यवस्थापन गरजेचे आहे, असे मत डॉ.दत्तात्रय गावडे यांनी व्यक्त केले. वडगाव येथे कृषी विभाग “आत्मा’अंतर्गत शेतकऱ्यांसाठी शेती शाळेत कामगंध सापळ्याच्या वाटपप्रसंगी डॉ. गावडे याननी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. होते. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी हिरामण शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीन पिकासाठी शेती शाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रगतशील शेतकरी संजय कुटे यांनी बायोडायनॅमिक कंपोस्ट खत आणि गांडूळ खत तयार करणे याविषयी मार्गदर्शन केले. या शेती शाळेस नारायणगावचे शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे, मंडल कृषी अधिकारी गंभीरे, कृषी सहाय्यक राजश्री नरवडे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक धोंडीभाऊ पाबळे आणि सूर्यकांत विरणक, तसेच वडगाव आनंदचे प्रगशील शेतकरी राजाराम चासकर, कृषी मित्र गुलाब घंगाळे, कल्याणी चासकर, आशा चासकर, रोहीणी गडगे, भीमराव हाडवळे, जयवंत जाधव, संजय कुटे आणि महिला शेतकरी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)