वडगाव(ज.स्वा) येथे हुतात्मा दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन

हुतात्मा दिनास 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल रक्तदान शिबिराचे आयोजन

पुसेसावळी(प्रतिनिधी) – देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्‍यातील ज्या भूमीपुत्रांनी हौतात्म्य पत्कारले त्या वीरांच्या स्मरणार्थ दि 9 सप्टेंबर रोजी हुतात्मा दिन साजरा केला जातो. ब्रिटिश सरकार विरोधात निघालेल्या वडूज तहसील कार्यालयावरील मोर्चात जयराम स्वामी वडगाव, पुसेसावळी आणि उंचीठाणे येथील 9 क्रांतीकारकांना हौतात्म्य आले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वडगाव येथे प्रत्येक वर्षी हुतात्मा दिन कार्यक्रमाचे आयोजन हुतात्मा खाशाबा शिंदे सांस्कृतिक व सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने केले जाते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावर्षी होणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना.प्रा.नितीन बानुगडे-पाटील उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार जयकुमार गोरे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांची उपस्थिती राहणार आहे.कार्यक्रमास कराड उत्तरचे धैर्यशील दादा कदम,जिल्हा परिषद सदस्य मनोजदादा घोरपडे,शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख हर्षद कदम,भाजपा जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सचिन नलवडे,जिल्हा परिषद सदस्या सुनिता कदम, क्रान्तिसिंह नाना पाटील यांचे पणतू सागर पाटील,संभाजीराव शिंदे,नितीन महाडिक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावर्षी हुतात्मा दिनास 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुहास शिंदे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)