वटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून वृक्षारोपण

नगरसेविका उषाताई नलवडे यांचा उपक्रम

नगर – पती-पत्नीचे नाते अतूट असते. हिंदू संस्कृतीत वडाचे पूजन करून जन्मोजन्मी हाच पती मिळो, अशी मागणी केली जाते. त्यासाठी वडाचे पूजन केले जाते. वडाला धागा गुंडाळून मनातील इच्छापूर्तीची अपेक्षा महिला करतात. वडाची झाडे शहरी भागात कमी प्रमाणात आहेत. त्यादृष्टीने वटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आल्याचे नगरसेविका उषाताई नलवडे यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रभाग 8 मधील जयश्री कॉलनी, पाइपलाइन रोड येथे वटसावित्री पौर्णिमेनिमित्त नगरसेविका उषाताई नलवडे यांनी वडाचे वृक्षारोपण केले. या वेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी संपत नलवडे, सागर भोपे, दादाभाऊ दळवी, ए. पी. कुलकर्णी, अक्षय दळवी, बाळासाहेब कवाणे, कमल कवाणे, वैशाली गुंड, नीता कवाणे, उषाताई चित्ते, अनिता कुलकर्णी, शारदा गारडकर, शोभा बडे, मनीषा आव्हाड, रेखा तुरकमाने, अश्‍विनी शेवाळे, सरस्वती शेवाळे, शोभा आव्हाड आदींसह महिला उपस्थित होत्या.

नलवडे पुढे म्हणाल्या की, वडाच्या झाडाची सावलीही मिळते. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने या झाडाला महत्त्व आहे. या झाडाचे जीवनमान खूप वर्षे असते. वृक्ष लावा, वृक्ष जगवा असे आपण म्हणतो. मात्र, प्रत्यक्षात किती वृक्ष लावून जगविले जातात याकडे आता गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. या मागील काळातही आपण प्रभागात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून ती झाडे जगविली आहेत. सध्या पावसाळा सुरू झाला असून, प्रभागातील प्रत्येक कुटुंबाने अंगणात एक झाड लावून ते जगविण्याचा प्रयत्न करावा, असे सांगितले.
बाळासाहेब कवाणे म्हणाले की, नगरसेविका उषाताई नलवडे यांनी प्रभागाच्या विकासाला प्राधान्य देत चांगली विकासकामे केली आहे. त्याबरोबरच सामाजिक जाणिवेचे भानही कायम जपले आहे. त्यांनी सूचविल्यानुसार या पावसाळ्यात प्रभागातील सर्व नागरिकांनी वृक्षारोपण करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)