वजीर सुळक्‍याच्या चढाईद्वारे स्त्री शक्‍तीचा जागर!

पिंपरी – समाजातील महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी. “मुलगी वाचवा…मुलगी जगवा’ असा संदेश देत स्त्रीशक्‍तीचा जागर करण्यासाठी अतिकठीण समजला जाणाऱ्या वजीर सुळक्‍यावर भोसरीतील गिरीजा लांडगे चढाई करणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर विभागात माहुली किल्ला आहे. याच परिसरात असलेल्या चंदेरी दक्षिण गटातील वजीर सुळका प्रस्तरारोहणासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जातो. त्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठीसुद्धा वांद्रे गावातून 3 तासांची अतिशय दमछाक करावी लागते.

या सुळक्‍याच्या पायथ्याशी पोहोचणे हेही सर्वसामान्य माणसाच्या अवाक्‍याबाहेर आहे. दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी गवताळ पाऊलवाट, दोन्ही बाजूस खोल दरी, पाठीवरील अवजड ओझे यातून जराजरी पाऊल घसरले, तर त्या व्यक्‍तीला दरीच्या जबड्यातच विश्रांती मिळते, अशी चर्चा आहे. पाण्याची प्रचंड कमतरता व त्यानंतर वजीर सुळक्‍याची 90 अंशातील सरळ उभी अतिकठीण चढाई करावी लागते. याच्या पूर्वेकडील दरीचा उतार तर 600 फुटांचा आहे. दक्षिणोत्तर पसरलेला माहुली किल्ला आणि त्याच्या दक्षिणेकडील टोकाला (वासिंद रेल्वे स्थानकाच्या दिशेला) मुख्य डोंगररांगेपासून सुटलेला वजीर सुळका सर करण्याचा संकल्प भोसरीतील गिरीप्रेमी चिमुकली गिरीजा लांडगे हिने केला आहे.

प्रत्येक प्रस्तारारोहकाच स्वप्न म्हणजे वजीर सुळक्‍याचा माथा. या सुळक्‍याविषयी दुर्गप्रेमींमध्ये प्रचंड कुतूहल आहे. ते त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळेच. या सुळक्‍याची चढाई करण्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून, दि. 10 रोजी ती ठाण्याकडे रवाना होणार आहे. तसेच, दि. 11 नोव्हेंबर रोजी रोप टाकून सुळक्‍याची चढाई करण्यात येणार आहे, अशी माहिती दुर्गप्रेमी धनाजी लांडगे यांनी दिली.

बालदिनी विधायक मोहीम
गिरीजाने दि. 25 ते 28 ऑक्‍टोबर 2018 नाशिक गडकोट वारी करीत 4 दिवसांत नाशिकमधील तब्बल 12 किल्ले पादाक्रांत केले आहेत. याद्वारे 51 वी दुर्ग भरारी भटकंती पूर्ण केली. गेल्यावर्षी सर्वात कमी वयात लिंगाणा सर महाराष्ट्रातील पहिली मुलगी असा मान तिने मिळवला आहे. या विक्रमाची वर्षपूर्ती करण्यासाठी बालदिनाचे औचित्य साधून वजीर सुळका सर करायची मोहीम आखली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)