वजन ठेवा नियंत्रणात… (भाग- 2)

वजन ठेवा नियंत्रणात… (भाग-१ )

जागतिक दर्जाच्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त असलेल्या या उपचार पद्धतीत कोणत्याही प्रकारचे इंजेक्‍शन, शस्त्रक्रिया, वेदना, आरक्तपणा नसतो. एका तासात 1 ते 3 इंच चरबी कमी करता येते. त्याव्यतिरिक्त स्थूलता कमी करण्यासाठी करण्यात येणारी शस्त्रक्रिया म्हणजे, बॅरिएट्रिक सर्जरी’.

अलीकडे मधुमेहाचे वाढते प्रमाण आणि त्याचा स्थूलतेही असलेला गहिरा संबंध लक्षात घेता, मधुमेही रुग्णांसाठी विशेष वरदान ठरत असलेली ही शस्त्रक्रिया समजली जाते. कारण केवळ स्थूल व्यक्तींसाठीच नव्हे तर स्थूल नसणारे तरीही मधुमेही, उच्च रक्तदाब रुग्ण, निद्रानाशासंबंधित विकारांशी झुंजणाऱ्या रुग्णांसाठीही ही शस्त्रक्रिया प्रभावी ठरत आहे.

मात्र शस्त्रक्रिया म्हटली की, आपण आधीच घाबरून जातो. त्याविषयी अनेक शंकाकुशंका मनात घर करू लागतात. बॅरिएट्रिक सर्जरीविषयक काही महत्त्वाच्या शंकांचं निरसन करताना हे लक्षात ठेवावं लागतं की, बॅरिएट्रिक सर्जरी कोणी करावी हे अगदी साध्या शब्दात सांगायचं तर ज्यांचं वजन प्रमाणापेक्षा 25 किलोंनी अधिक आहे किंवा ज्यांना मधुमेह आहे अशा व्यक्तींनी ही शस्त्रक्रिया करून घ्यावी. वैद्यकीय नियमांप्रमाणे 32.5 पेक्षा अधिक बीएमआय असलेल्या व्यक्ती या बॅरिएट्रिक सर्जरीकरिता योग्य मानल्या जातात.

एखादी व्यक्ती शस्त्रक्रियेस उत्सुक नसल्यास त्यांचं काय, तर अशांसाठी फारच मर्यादित प्रमाणात पर्याय उपलब्ध आहेत. कारण आहार किंवा व्यायामावर आधारित अन्य कोणत्याही पद्धतीचा अवलंब केल्यानंतर पुन्हा वजन वाढण्याचं प्रमाण 98 टक्के असते.

या शस्त्रक्रियेनंतर जर रुग्णाने बेफिकिरीने तळलेले किंवा गोड पदार्थ खाण्यास सुरूवात केली तरच वजन पुन्हा वाढू शकतं. शस्त्रक्रियेनंतरही जेव्हा रुग्णाचं वजन कमी होऊ लागतं तेव्हा विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. प्रथिनांचे उच्च प्रमाण असलेला आहार आणि त्याच्या जोडीने जीवनसत्त्व व कॅल्शियमचंही पुरेसं प्रमाण असलेल्या पदार्थाचं नियमितपणे सेवन करणं खूप महत्त्वाचं ठरतं. साधारणपणे दोन आठवडे रुग्णांना पातळ पदार्थ खायला दिले जातात आणि दोन ते चार आठवडे मऊ अन्न खाण्यास सांगितलं जातं. बॅरिएट्रिक सर्जरी झाल्यापासून एक महिन्यानंतर रूग्णांना संपूर्ण आहार घेण्याची परवानगी दिली जाते.

शस्त्रक्रियेनंतर आता आपलं वजन वाढणारच नाही, अशा भ्रमात राहणं चुकीचं आहे. भविष्यातील सुदृढ जीवनशैलीसाठी आहार आणि व्यायामाचं नियोजन सुरूच राहायला हवं.
बॅरिएट्रिक सर्जरीनंतर 24 तासांतच रुग्णास चालण्याचा व्यायाम करण्यास उत्तेजन दिलं जातं. तसंच शस्त्रक्रियेनंतर तीन आठवडयांनंतर पोहणं आणि चार आठवडयांनंतर जीममधील व्यायाम सुरू करण्याचा सल्लाही रुग्णांना दिला जातो. मात्र तीन महिन्यांपर्यंत पोटाशी संबंधित व्यायाम टाळणं गरजेचं असतं.’

मुळात ही वेळ येऊ देण्यापेक्षा जितकं आपण आपल्या बाह्यसौंदर्याबाबत सजग असतो तितकंच किंबहुना अधिक आरोग्याशी निगडीत अंतर्गत गोष्टींबाबतही असलं पाहिजे.
अंतर्बाह्य सौंदर्य आणि सुदृढतेसाठी चालणं’ हा उत्तम पर्याय असल्याचं म्हटलं जातं. या पायपिटासना’च्या सर्वज्ञात फायद्यांना तर अलीकडेच इंपिरिअल कॉलेज लंडन आणि पब्लिक हेल्थ फाउंडेशन या संस्थांनी सूक्ष्म संशोधनाने पुन:श्‍च दुजोरा दिला आहे.

स्थूलता कशी ठरवली जाते..
जिवावर बेतू शकते बॅरिऍट्रीक सर्जरी
प्रत्येक पुरुषाला, स्त्रिला आपली शरीरयष्टी आकर्षक असावी, असे मनापासून वाटत असते. मात्र त्यासाठी लागणारे कष्ट करण्याची तयारी मात्र फार कमी लोकांची असते. बऱ्याचदा अतिलठ्ठ व्यक्‍ती व्यायाम करण्याऐवजी आणि खाण्यावर नियंत्रण ठेवण्याऐवजी वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रिया (ओबेसिटी सर्जरी) करण्याचा पर्याय निवडतात. नुकताच एका व्यावसायिकाचा आणि कलाकाराचा अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. मुळात या शस्त्रक्रिया सर्वांनाच लागू होत नाहीत, असे संबंधित डॉक्‍टरांचे म्हणणे आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्यामध्ये जंक फूड, दुग्धजन्य पदार्थ, दारू, सिगारेट यांचे प्रमाण वाढत चालले आहे. परिणामी शरीरात चरबीचे प्रमाण वाढते. विशेषत: जंक फूड आणि एकाच ठिकाणी बसून काम करणा-यांचे वजन जास्त वाढते. वजन वाढल्यानंतर व्यायामशाळा, योगसाधना न करता अनेक जण जाडी कमी करण्याच्या शस्त्रक्रिया करतात. एका बांधकाम व्यावसायिकाचा आणि चित्रपटातील कलाकाराचा जाडी कमी करण्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला होता. तर काही दिवसांपूर्वीच अशाच एका व्यक्‍तीचा चरबी कमी करण्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला होता.

या प्रकरणी त्याच्या नातेवाइकांनी महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडे धाव घेतली आहे. एखाद्या अतिलठ्ठ व्यक्‍तीचे बीएमआय (बॉडीमास्क इंडेक्‍स) पाहून डॉक्‍टर अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया कराव्यात का नाही, याचा निर्णय घेतात. जाडी कमी करण्याच्या शस्त्रक्रियेकरता सुमारे 3 ते 5 लाख रुपये खर्च येतो. मात्र काही ठिकाणी या शस्त्रक्रिया कमी किमतीत केल्या जातात. आकडेवारीचा विचार केला असता, मागील वर्षी भारतात जाडी कमी करण्याच्या सुमारे 7 हजार शस्त्रक्रिया झाल्याची नोंद आहे. यंदाच्या वर्षी या आकडेवारीत वाढ होण्याची दाट शक्‍यता आहे.

चार प्रकारच्या शस्त्रक्रिया
जाडी कमी करण्याच्या शस्त्रक्रिया चार प्रकारच्या असतात. यात बिरायट्रिक, लॅब बॅंड, स्लिव्ह गॅसेक्‍टॉमी, गॅस्ट्रिक बायपास या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. लॅब बॅंड शस्त्रक्रियेमध्ये जठरावर एक पट्टा लावतात. त्यामुळे पोटाचा घेर कमी होतो. पोट मोठे दिसत नाही. या शस्त्रक्रियेमुळे कमी खाऊनही पोट भरल्याचे समाधान मिळते. स्लिव्ह गॅसेक्‍टॉमी शस्त्रक्रियेत पोटाचा काही भाग कापला जातो. तर गॅस्ट्रिक बायपासमध्ये आतड्यांचा काही भाग कापण्यात येतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)