वजन कमी करण्याच्या प्रयत्नात अनुष्का शेट्टी 

“बाहुबली’मुळे एकदम लाईम लाईटमध्ये आलेल्या अनुष्का शेट्टीला सध्या आपल्या वाढत्या वजनाची चिंता लागून राहिली आहे. 2005 मध्ये तेलगू सिनेमा “सुपर’मधून तिने पदार्पण केले होते. त्यानंतर 2015 मध्ये “साईझ झिरो’ या आणखी एका तेलगू सिनेमासाठी तिला तब्बल 20 किलो वजन वाढवायला लागले होते. त्या सिनेमात तिला एका जाड्या मुलीचा रोल करायचा होता. त्यानंतर मात्र तिने वजन घटवायला सुरुवात केली होती. दररोज दोन तास जीममध्ये वर्कआऊट करूनही तिचे वजन आटोक्‍यात आले नाही.

कदाचित यामुळेच तिला प्रभासबरोबरच्या “साहो’तील रोल सोडावा लागला होता. आता तिने नॉर्वेमधील न्यूट्रॉपॅथीची ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली आहे. या नॅचरल थेरपीच्या आधारे वजन आटोक्‍यात येऊ शकेल, असा विश्‍वास तिला वाटतो आहे. “बाहुबली’ आणि “बाहुबली 2’नंतर अनुष्का आणि प्रभासचे अफेअर उजेडात आले. पण याबाबत या दोघांनीही काहीही व्याच्यता केलेली नाही. सिने मॅगझीनमधून यांच्या संभाव्य लग्नाबाबत खूप चवीने वर्णन केले जायला लागले. या गॉसिप गप्पांचा तिला आगोदर त्रास व्हायचा. मात्र आता काहीही वाटत नाही. तिला तर चिंता तिच्या वाढलेल्या वजनाची आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)