वक्फ मंडळाला लवकरच नवीन अध्यक्ष – विनोद तावडे

मुंबई – राज्य वक्फ मंडळाच्या नवीन अध्यक्षाची नियुक्ती लवकरच केली जाणार असल्याचे अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.

सदस्य अब्दुल्लाखान दुर्राणी यांनी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या नियमित बैठका होत नसल्याची लक्षवेधी उपस्थित केली होती. यास उत्तर देताना  तावडे बोलत होते. राज्य वक्फ मंडळाच्या अध्यक्षांच्या नियुक्तीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. लवकरात लवकर अध्यक्षांची नियुक्ती होईल. त्यानंतर या मंडळाच्या नियमित बैठका होतील. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या नियमित बैठका आयोजित करणे हा विषय खुद्द महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अखत्यारितील असल्याचेही तावडे यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)