वकील संघटनेच्या निवडणूक प्रक्रियेस सुरुवात

अध्यक्षपदासाठी ऍड. रमेश जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नगर – नगर शहर वकील संघटनेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता निवडणूक प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. आज अर्ज भरण्याच्या दुस-या दिवशी संघटनेच्या अध्यक्षपदासाठी माजी सरकारी वकील रमेश जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी ऍड.कल्याण पागर यांच्याकडे दाखल केला.

यावेळी ऍड. रमेश जगताप यांच्यासमवेत अनेक ज्येष्ठ व कनिष्ठ वकील उपस्थित होते. अर्ज भरल्यानंतर बोलताना ऍड. जगताप म्हणाले, “”वकील हा न्याय व्यवस्थेतील अविभाज्य घटक आहे. त्यामुळे जिल्हा न्यायालयातील वकील संघटनेची निवडणूक लोकशाही पद्धतीने व्हावी यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. सर्व वकिलांच्या पाठबळावर वकील संघटनेची अध्यक्षपदाची निवडणूक लढवीत आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य मिळणार आहे. अनेक ज्येष्ठ व अनुभवी वकिलांची मला साथ आहे. जिल्हा न्यायालयातील वकिलांचे प्रलंबित प्रश्‍न सोडवण्यासाठी पुढाकार घेत आहे.”
यावेळी ऍड. रमेश जगताप यांचा उमेदवारी अर्ज भरताना ऍड. कारभारी गवळी, सरकारी वकील सुरेश लगड, ऍड. शिवाजी अनभुले, माजी अध्यक्ष मुकुंद पाटील, ऍड. बी. एन. काकडे, ऍड. एम. एम. गवळी, ऍड. जॉन कुसमुडे, ऍड. बाळासाहेब पवार, ऍड. राजेश कातोरे, ऍड.बर्डे, ऍड. धामणे, आदी प्रमुख वकील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)