वकील लोक डेंजरस असतात : ना.रामराजे

खासदार उदयनराजेंना गर्भित इशारा : जिल्हा बॅंकेत तीन राजे एकाच व्यासपीठावर

सातारा- जिल्ह्यात राजेअंतर्गत वाद टोकाला पोहचलेला असताना शुक्रवारी जिल्हा बॅंकेतील कार्यक्रमाच्या निमित्ताने वादाच्या केंद्रस्थानी असलेले तिन्ही राजे व्यासपिठावर एकत्र आले. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे ना.निंबाळकर यांनी युती सरकारच्या काळात आपल्या वकीली कौशल्याने ऊसावरील झोन बंदी कशाप्रकारे उठविली हे सांगताना वकील लोक डेंजरस असतात, असा गर्भित इशारा उपस्थित खा.उदयनराजे यांचा नामोल्लेख टाळत दिला.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या किसान-एम-पे ऍपचे लॉचिंग सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ना.रामराजे बोलत होते. त्यावेळी बॅंकेचे अध्यक्ष आ.शिवेंद्रसिंहराजे,संचालक खा.उदयनराजे भोसले, आ.बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष सुनील माने, ज्येष्ठ संचालक दादाराजे खर्डेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, जिल्हा बॅंकेच्या कार्यक्रमांकडे कायम पाठ फिरविणारे खा.उदयनराजे हे कार्यक्रमाची सुरूवात झाल्यानंतर काही वेळात व्यासपीठावर दाखल झाले. व्यासपिठावरच येताच त्यांनी दादाराजे खर्डेकर यांना सन्मानपुर्वक मुजरा करत व्यासपिठाच्या एका बाजूला बसण्याचे पसंत केले. हे सर्व होत असताना उपस्थितांच्या नजरा ना.रामराजे व आ.शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे असताना त्यांनी खा.उदयनराजेंकडे पाहणे टाळले. तर आ.शिवेंद्रसिंहराजे यांनी आपल्या भाषणाच्या सुरूवातीला कार्यक्रमाला उपस्थितत मान्यवरांची नावे घेताना खा.उदयनराजे असा उल्लेख करत राजकीय टिकाटिप्पणी करणे टाळले.

त्याचप्रमाणे ना.रामराजे यांनी देखील भाषणाच्या सुरूवातीला उपस्थितांची नावे घेताना उदयनराजेंचा नामोल्लेख खासदार साहेब केला. मात्र, भाषणाची अखेर करताना त्यांनी खासगी बॅंकांना ज्या प्रमाणे शेती कर्ज वाटपाची मुभा दिली आहे त्याचप्रमाणे जिल्हा बॅकांना देखील औद्योगिक कर्ज वाटपाचे अधिकार देण्यात यावे असे सांगताना सन.1995 च्या दरम्यान युती सरकारच्या काळात ऊसाची झोन बंदी उठविण्यासाठी आपण सुप्रिम कोर्टापर्यंत कशी यशस्वी लढाई केली व आपली वकीलीचे कला कौशल्य कसे वापरले हे सांगताना वकील लोक डेंजरस असतात असा अप्रत्यक्ष इशारा दिला मात्र पुढे त्यांनी विनोदाचा भाग सोडून द्या, असे ही सांगायला ते विसरले नाहीत.

त्यांनी भाषण करणे टाळले
कार्यक्रमाच्या सुरूवातील बॅंकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी प्रास्ताविक केल्यानंतर आ.शिवेंद्रसिहराजे यांनी भाषणाला सुरूवात केली. त्यामुळे आमदारांननंतर खासदार भाषण करणार आहेत का, अशी विचारणा करण्यासाठी सुत्रसंचालक सुजित शेख हे खा.उदयनराजे यांच्याकडे विचारणा करण्यासाठी गेले. मात्र, खा.उदयनराजे यांनी आपण बोलणार नसल्याचे स्पष्ट सांगून टाकले व त्यामुळे उपस्थित श्रोत्यांची मात्र निराशा झाली.

खा.उदयनराजे अन दादाराजेंची प्रदिर्घ चर्चा
खा.उदयनराजे हे व्यासपिठावर येताच त्यांनी ज्येष्अ संचालक व आ.शिवेंद्रसिंहराजे यांचे मामा दादाराजे खर्डेकर यांना राजघराण्यातील परंपरेनुसार सन्मानपुर्वक मुजरा केला. त्याचबरोबर त्यांनी मंत्री सुभाष देशमुख यांच्या शेजारी बसण्याचे टाळत दादाराजे खर्डेकर यांच्या शेजारी बसणे पसंत केले. केवळ बसण्यापुरते मर्यादित न राहता एका बाजूला आ.शिवेंद्रसिंहराजे, ना.रामराजे व ना.सुभाष देशमुख यांची भाषणे सुरू असताना खा.उदयनराजे व दादाराजे यांच्यात तब्बल अर्धा तास प्रदिर्घ चर्चा सुरू होती.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)