वकिली हा प्रतिष्ठित व्यवसाय : न्या. ओका

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार अभिरूप न्यायालय स्पर्धा

पुणे – वकिली व्यवसाय हा एक प्रतिष्ठित व्यवसाय मानला जातो. वकिली व्यवसाय करणे ही कला आहे, जी प्रत्येक वकिलाने जोपासणे गरजेचे आहे. वकिलांची कोर्टामध्ये चांगली वागणूक असायला हवी आणि स्वत:ची प्रतिष्ठा जपणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. ए. एस. ओका यांनी केले.

भारती विद्यापीठाच्या न्यू लॉक कॉलेज पुणेतर्फे आयोजित “न्या. पी. एन. भगवती आठवी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार अभिरूप न्यायालय स्पर्धे’च्या सांगता समांरभात ते बोलत होते. यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. जे. आर. मिढा, न्या. दीपा शर्मा, केरळ उच्च न्यायालयाचे सी. टी. रविकुमार, राजस्थान उच्च न्यायालयाचे न्या. व्ही. एस. सिरधाना, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे अजय गोयल, प्राचार्य डॉ. मुकुंद सारडा, कुलसचिव जी. जयकुमार उपस्थित होते.

न्या. ओका म्हणाले, न्यायाधीशाचा अभ्यास झाला पाहिजे. चांगली भाषा अवगत केली पाहिजे. कायद्याचा सखोल अभ्यास हवा. काही वेळेला शांत राहणे सुद्धा जमले पाहिजे. वकिलांचे पहिले कर्तव्य हे कोर्टाची मदत करणे. कोर्ट आणि अशिल यामध्ये कोर्टाला प्राधान्य दिले गेले पाहिजे. जिल्हा न्यायालय किंवा सत्र न्यायालयातही वकिली व्यवसाय करणे आवश्‍यक आहे, असेही ते म्हणाले.

न्या. मिढा म्हणाले, कायद्याचे दोन भाग आहेत. एक शिकण्याचा कायदा, तर दुसरा कायदा कसा वापरायचा हे शिकून घेतली पाहिजे. वकिलांनी सत्य जाणून घ्यायची कला आत्मसात करणे आवश्‍यक आहे. दिशा शर्मा म्हणाल्या, मूलभूत अधिकार हे एक मानवी अधिकाराचा एक अविभाज्य घटक आहे. जो प्रत्येक भारतीयाला संविधानातून मिळालेला आहे. मानवी अधिकारांचे उल्लंघन हे मानवतेचे उल्लंघन आहे. मानवी अधिकार हे प्रत्येकाला त्याच्या जन्मापासून मिळालेला अधिकार आहे. डॉ. मुकुंद सारडा यांनी प्रास्ताविक केले.

सिंबायोसिस लॉ स्कूलला विजेतेपद
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार अभिरूप न्यायालय स्पर्धेत सिंबायोसिस लॉ स्कूलने विजेतेपट पटकाविले. त्यानंतर अनुक्रमे डिपार्टमेंट ऑफ लॉ युनिर्व्हसिटी ऑफा ढाका, केरळच्या नॅशनल युनिर्व्हसिटी ऑफ ऍडव्हान्स लिगल स्टडीज उपविजेते ठरले. बेस्ट मेमोरिअल ऍवॉर्ड लखनऊच्या राम मनोहर लोहिया नॅशनल ला युनिर्व्हसिटीला मिळाला. बेस्ट स्पिकर ऍवॉर्ड रिफत झबीन खान हिने पटकाविले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)