वकिलांसाठी मोफत हृदयरोग निदान, उपचार शिबिर

पुणे – पुणे जिल्हा बार असोसिशन आणि मॅग्नम हेल्थ केअर-हार्डीकर रुग्णालय यांच्या वतीने न्यायालयात वकिलांसाठी मोफत हृदयरोग निदान आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजीनगर न्यायालयातील अशोका हॉल येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत झालेल्या या शिबिराचा लाभ 850 वकिलांनी घेतला.

या शिबिराचे उद्‌घाटन सत्र आणि विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष पवार, उपाध्यक्ष ऍड. भूपेंद्र गोसावी, ऍड. रेखा करंडे, सचिव ऍड. संतोष शितोळे, ऍड. लक्ष्मण घुले, खजिनदार ऍड. प्रताप मोरे, हिशेब तपासणीस ऍड. सुदाम मुरकुटे, कार्यकारिणी सदस्य, मॅग्नम हेल्थ केअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक घोणे, डॉ. सदाशिव कुंदेन उपस्थित होते.

वकिलांना कामाचा तणाव असतो. त्यामुळे 80 टक्के वकिलांना उच्च रक्तदाब असतो. त्यासाठी वकिलांनी काळजी घेतली पाहिजे, असे डॉ. घोणे, डॉ. कुंदेन यांनी सांगितले. तपासणीच्या वेळी बारचे कार्यकारिणी सदस्य ऍड. रमेश राठोड यांनी मोफत कायद्याच्या पुस्तकांचे वाटप केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)