वंशपरंपरागत अधिकार संपुष्टात

मुंबई – पंढरपूर आणि शिर्डीच्या धर्तीवर कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात बुधवारी विधानसभेत एकमताने विधेयक मंजूर करण्यात आले. या पगारी पुजाऱ्यांमध्ये 50 टक्‍के महिला पुजारीही असणार आहेत.

मंजूर विधेयकानुसार आता पगारी पुजारी नेमण्यात येतील. पूजा करणाऱ्या व्यक्‍तींचे अनुवांशिक, संविदाकृत अधिकार नाहीसे होणार आहेत. मात्र असे वंशपरंपरागत अधिकार संपुष्टात आलेल्या व्यक्‍तीला 90 दिवसांत भरपाईच्या रकमेसाठी जिल्हा न्यायालयाकडे अर्ज करता येईल.

नुकसानभरपाईसाठीचे सरासरी उत्पन्न हे नियमाच्या दिनांकापुर्वीच्या मागील दहा वर्षांच्या उत्पन्नाच्या आधारे निर्धारित करण्यात येणार असल्याची माहितीही नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)