…वंजारा व अमिन यांची खटल्यातून नावे वगळण्याची मागणी फेटाळली

इशरत जहॉं बनावट चकमक प्रकरण
अहमदाबाद – इशरत जहॉं बनावट चकमक प्रकरणाच्या खटल्यातून आपली नावे वगळण्यात यावीत अशी मागणी करणारे पोलिस अधिकारी डी जी वंजारा आणि एन. के. अमिन यांचे अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावले. हे दोन्ही पोलिस अधिकारी सध्या सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या अर्जाला सीबीआय आणि इशरतची आई शमिमा कौसर यांनी आक्षेप घेतला होता.

वंजारा हे गुजरात पोलिस दलाचे उपपोलिस महानिरीक्षक म्हणून काम करीत होते . याच प्रकरणातील पोलिस अधिकारी पी.पी. पांडे यांची ज्या प्रमाणे मुक्तता करण्यात आली करण्यात आली आहे त्याच आधारावर आपलेही नाव या प्रकरणातून वगळले जावे अशी मागणी त्यांनी केली होती. अमिन हे निवृत्त पोलिस अधिक्षक असून त्यांनी ही चकमक बनावट नव्हती असा युक्तिवाद करून सीबीआयने आमच्या विरोधात खोटा खटला दाखल केल्याने आपली यातून सुटका करावी अशी मागणी केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यांच्या अर्जाला विरोध करताना इशरतच्या आईच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की इशरतची हत्या नियोजनबद्धपणे करण्यात आली असून त्यासाठी पोलिसांनी वरीष्ठ पातळीवर कट रचला होंता त्यात वंजारा आणि अमिन हे सहभागी झाले होते असे त्यांचे म्हणणे होते. इशरत जहा हिची 15 जून 2004 रोजी बनावट चकमकीत पोलिसांनी हत्या केल्याचा आरोप असलेले हे प्रकरण आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)