सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण

मुंबई: सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणात गुजरात एटीएसचे माजी प्रमुख डी. जी. वंजारा आणि अन्य चार पोलिस अधिकाऱ्यांना वगळण्याच्या ट्रायल कोर्टाच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. वंजारा आणि अन्य चार पोलिस अधिकाऱ्यांना खटल्यातून वगळण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या अर्जातील मुद्‌द्‌यांमध्ये काही तथ्य दिसत नाही असे नमूद करीत हायकोर्टाने त्यांना हा दिलासा दिला आहे. या प्रकरणातील सहआरोपी विपुल आगरवाल यांनाही वगळण्याचा आदेश हायकोर्टाने दिला आहे. त्यांना असा दिलासा ट्रायल कोर्टाने मात्र दिला नव्हता.

या खटल्यातून जे अन्य पोलिस अधिकारी वगळले गेले आहेत त्यात गुजरात पोलिस दलाचे राजकुमार पंडियन, एन. के. अमिन आणि राजस्थान पोलिस दलाचे एम.एन. दिनेश आणि दलपतसिंह राठोड यांचा समावेश आहे. दिनेश, पंडियन, आणि वंजारा यांना या खटल्यातून वगळण्याच्या ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला सोहराबुद्दीन याचा भाऊ रबाउद्दीन याने आव्हान दिले होते. अन्य दोन जणांच्या संबंधात सीबीआयने याचिका दाखल केली होती. सोहराबुद्दीन, त्याची पत्नी कौसर बी आणि प्रजापती या तीन जणांच्या हत्या प्रकरणात एकूण 33 जणांच्या विरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)