वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करताना वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते

वाढत्या महागाईसह वीज वितरणच्या कारभाराचा केला निषेध

सातारा,दि.8 प्रतिनिधी- इंधनाचे वाढत्या दरामुळे वाढती महागाई तसेच वीज वितरणकडून जनतेची होणारी लूटीचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य जनतेच्या जीवनात रोज लागणाऱ्या वस्तूंच्या किंमती वाढल्याने जीवनमान विस्कळीत झाले आहे. तर दारिद्रयरेषेखालीत व्यक्तींना एका बाजूला गॅस कनेक्‍शन मोफत देण्यात येत असला तरी दुसऱ्या बाजूला गॅसच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळे गॅस विकत घेणे व रॉकेल देखील मिळत नाही अशी स्थिती आहे. तर वीज वितरणने दर वाढविले असून बिल भरण्यास उशिर झाल्यास व्याज आकारणी केली जात आहे. तसेच शासनाकडून अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार, आरोग्य व शिक्षण देण्याची जबाबदारी असताना एक ही सुविधा उपलब्ध होत नाही. त्यामुळे किमान आरोग्याची व्यवस्था शासकीय रूग्णालयामार्फत देण्यात यावी. तसेच संस्कृतीच्या नावाखाली विना परवाना शस्त्र पुजन करण्यात आल्यास ती जप्त करण्यात यावीत व सांस्कृतिक दहशतवाद निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना पत्राव्दारे देण्यात आलेल्या धमकीची चौकशी करण्यात यावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. यावेळी चंद्रकांत खंडाईत, भरत लोकरे, गणेश भिसे, संजय पोतदार, सूर्यकांत पवार, निलेश लाड, बबनराव करडे, मुरलीधर पवार, शाहीर प्रकाश फरांदे, बाळासाहेब माने, दत्ताजीराव जाधव आदी.उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)