वंचित, दिव्यांगांच्या सेवेत प्रत्येकाचे योगदान- अनिल राठोड

 लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेच्या दिंडीचे स्वागत

नगर: महादेव कोतकर कुटुंबिय धार्मिक असून, दरवर्षी लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेच्या वतीने काढण्यात येणाऱ्या दिव्यांगांच्या दिंडीचे उत्स्फूर्तपणे स्वागत करते. यंदाच्या वर्षीही त्यांनी हा उपक्रम आयोजित केला. मला मागील वर्षी व यंदाही यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. सामाजिक भावनेतून महादेव कोतकर व हर्षवर्धन कोतकर चांगले काम करीत आहेत. दीन, दुबळे, गरजू व वंचित घटकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी समाजातील प्रत्येकाने योगदान द्यावे. अशा प्रकारच्या सेवेमुळे तुम्हाला परमार्थ प्राप्ती मिळते, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.

लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्था, वाघोली, पुणे यांच्या वतीने आयोजित पुणे ते शिर्डी दिव्यांगांच्या पायी दिंडी सोहळ्याचे कामरगाव येथे हॉटेल महाज्योतच्या वतीने स्वागत करून आरती करण्यात आली. यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड, युवा सेनेचे शहरप्रमुख हर्षवर्धन कोतकर, तुकाराम कातोरे, संग्राम कोतकर, महादेव कोतकर आदींनी दिंडी आयोजक अर्जुन केंद्रे, अप्पासाहेब शिवळे, ज्ञानेश्‍वर केंद्रे आदींचे स्वागत करून पालखीचे दर्शन घेतले. राज्यात काढला जाणारा दिव्यांगांचा हा सर्वांत मोठा पायी दिंडी सोहळा आहे. याप्रसंगी मदन आढाव, राजेंद्र आंधळे, सुनील भुजबळ, राजेंद्र बुरकुले, राम मानेकर, राम ठोकळ, शरद तात्या ठुबे, संग्राम केदार, प्रेम कोहोक, चेतन साळुंके, सोपान शिंदे आदी उपस्थित होते. कोतकर म्हणाले, मला आठवते तसे माझ्या कुटुंबियांकडून या दिव्यांग दिंडीचे स्वागत करून त्यांना मिष्टान्न भोजन दिले जाते. त्यांची सेवा केली जाते, तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तू भेट दिल्या जातात, यातच आम्हाला मोठे आत्मिक समाधान मिळत असल्याचे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)