वंचितांची राजकीय शक्ती दाखविण्याची वेळ – भीमराव आंबेडकर

पिंपरी – वंचितांची राजकीय शक्ती इतर पक्षांना दाखविण्याची आज वेळ आली आहे, असे आवाहन भारिप बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी केले.

चिखली परीसरातील घरकुल संकूल येथे भारिप बहुजन महासंघाच्या शाखेचे उद्‌घाटन आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, पदाधिकारी रहीम सय्यद, सुहास देशमुख, राजू उबाळे, अमीर खान, के. डी. वाघमारे, अंकुश कानडी, वॉर्ड अध्यक्ष विजय गेडाम उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भीमराव आंबेडकर पुढे म्हणाले, आजपर्यत प्रत्येक राजकीय पक्षाने गोर-गरीब, वंचीताचे प्रश्न सोडवले नाहीत. आपल्याला मतदान करणारा समाज म्हणून दुसऱ्या पक्षांनी आपला व वंचितांचा वापर केला. छोट्या छोट्या जाती, समुहाला राजकीय सत्तेपासून दूर ठेवले. राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर, एम. आय. एमचे खासदार आसुउद्दीन ओवेसी याच्या गटबंधनात यापुढे आपल्याला सत्ताधारी समाज बनायचा आहे. वंचितांची, गोरगरीबांची सामुहिकरित्या ताकद दुसऱ्या पक्षांना दाखविण्याची वेळ आली आहे. वंचितांना सत्येत सहभाग मिळवून द्यावयाचा आहे. मागासवर्गियाचे उमेदवार संकुचीत समाजापुढे निवडून येत नाही ही मानसिकता सर्वत्र दिसून येत आहे.

आजपर्यत भारिप बहुजन महासंघ एकटा होता. आता मुस्लिम, धनगर, अल्पसंख्यांक ओबीसी मातंग समाज, गोरगरीब, वंचित जोडले गेले आहेत. अशा सगळ्यांची मोट बांधून येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. औरंगाबाद पंढरपूर, सोलापूर येथे झालेलया सभाच्या गर्दीने आजवरचे उच्चांक मोडले आहेत तसा अहवाल पोलीस यंत्रणेचा आहे. आजपर्यंत जे-जे सत्तेत होते त्यांनी महाराष्ट्र लुबाडला आहे. मात्र समाजाचे प्रश्न आजही तसेच आहे. येणारी निवडणूक ही निर्णायक लढाई असणार आहे. सध्याचे मनुवादीचे सरकार पुन्हा सत्तेवर बसले तर अनेक प्रकारच्या अडचणी येतील. यासाठी प्रत्येकाने मानसिक तयारी ठेवा. आपण संविधानाच्या नुसार चालत आहोत कायदा हातात न घेता लोकशाही मार्गाने लढा देण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन भीमराव आंबेडकर यांनी केले.

यावेळी भारिप संघटक राहूल अंभोटे, राजेंद्र बनसोडे, किरण गायकवाड, दीपक मिरपगार, भगवान तेलगोटे, संदीप कांबळे, नंदू माने, विनोद इनकर यांचा सत्कार करण्यात आला. भारिपचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, वॉर्ड अध्यक्ष विजय गेडाम यांनी मनोगत व्यक्त केले. कैलास लोखंडे यांनी सूत्रसंचलन केले व आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)