ल्होत्सेच्या शिखरावर साताऱ्याच्या कन्येचा विक्रमी झेंडा

संदीप राक्षे

प्रियांका मोहितेचा जागतिक विक्रम, आशियातील सर्वात तरुण गिर्यारोहक

सातारा – उणे 13 अंश सेल्सिअस तापमान आणि विरळ प्राणवायू अशा प्रतिकूल परिस्थितीत प्रचंड दमसास ठेवणाऱ्या साताऱ्याच्या प्रियांका मंगेश मोहिते एव्हरेस्ट कन्येन अठरा तासाच्या खडतर संघर्षानंतर नेपाळच्या हद्दीतील जगातील चौथ्या उंच लोत्से शिखरावर अखेर पाय ठेवला. आणि जगातील तब्बल सात उंच शिखरांना पादाक्रांत करणारी जगातील सर्वात तरुण गिर्यारोहणाचा दुर्मिळ मान पटकावला. बुधवारी ( 16 मे ) दुपारी दीड वाजता प्रियांकाने या भीम पराक्रमाची नोंद केली. एव्हरेस्टच्या बेस कॅप वन आणि टू च्या दरम्यान प्रियांका चा माघारीचा प्रवास यशस्वीरित्या सुरू आहे. प्रियांकाचे वडिल मंगेश मोहिते यांनी हा सुवर्णक्षण दैनिक प्रभात शी संवाद साधत मनापासून जागवला.

 

साहसाचं वेड हे रकतातच असावं लागत आणि वयाच्या कमी टप्प्यातच जागतिक दर्जाची सात शिखरं पायाखाली ठेवायची त्याला कणखर मानसिकता आणि शारीरिक तंदुरुस्ती आणि जोडीला असाव लागतं ते वाघाचं काळीज. पण लढवय्येपणा ज्या मातीतच मुरलायं त्याच साताऱ्याच्या या वाघिणीन मकालू माउंटेनेअरिंग च्या साथीने ल्होत्सेच्या चढाइला दि 15 मे रोजी चढाइला प्रारंभ केला. त्याआधी प्रतिकूल हवामानाचा दम सास जोखणारा एव्हरेस्ट बेस कंप 1 व बेस कॅंप 2 तिने यशस्वीरित्या पूर्ण केला. प्रतिकूल हवामान थंडगार बोचरे वारे अशा वातावरणात सायंकाळी सव्वासात वाजता पायोनिअर ग्रुपच्या वीस सदस्यांनी 8516 मीटर उंचीच्या शिखर चढाइला प्रारंभ केला. रात्री दीड वाजेपर्यंत दोन टप्प्यांची चदाई करण्यात आली. मात्र नंतरच्या टप्प्यात ल्होत्सेच्या पश्‍चिम बाजूच्या खड्या चढाइने सर्वाचीच सत्वपरीक्षा पाहिली. तरी पण प्रियांकाने संयम आणि उर्जा राखत तीन टप्प्यात ल्होत्सेच्या शिखरावर गुरुवारी दुपारी एक वाजून सदोतीस मिनिटाने पाय ठेवला. मकालूचे मुख्य प्रशिक्षक एस आर दोर्जी यांनी या जागतिक विक्रमाची खबर थेट साताऱ्यात. दूरध्वनीवरून प्रियांकाचे वडिल मंगेश मोहिते यांना दिली. लेकीच्या या भीमपराक्रमाची खबर कळताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले .ल्होत्से शिखर सर करणारी प्रियांका ही जगात सर्वात कमी वयाची गिर्यारोहक ठरली आहे. एव्हरेस्ट कन्येनं पुन्हा एकदा साताऱ्याची मान अभिमानाने उंच केली यात शंकाच नाही.

प्रियांकाच्या पराक्रमाला आर्थिक मदतीची गरज

ल्होत्सेच्या मोहिमेला प्रियांकाला तब्बल साडेपंधरा लाख रुपये खर्च आला आहे. बारामतीच्या शरदचंद्र चॅरिटेबल ट्रस्टने प्रियांकाला या मोहिमेसाठी तब्बल साडेसात लाख रुपयांची मदत केली. तर मंगेश मोहिते यांनी यथाशकती चार लाखाची जुळवाजुळव केली आहे. अद्यापही प्रियांकाच्या या जागतिक दर्जाच्या रेकॉर्ड नोंदणीसाठी अद्याप चार लाख रुपयांची गरज आहे. प्रियांकाच्या या रेकॉर्डची नोंद होईल पण त्याच्या प्रमाणित नोंदणीसाठी मोहिते कुटुंबियांना ही यातायात करावी लागणार आहे. साताऱ्याच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातून अद्याप प्रियांकाला कोणतीच आर्थिक मदत मिळाली नाही.एव्हरेस्ट मोहिमेच्या यशानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रियांका मोहितेला तब्बल पस्तीस लाख रुपयांची मदत जाहीर केली. मात्र राजकीय घोषणा ही बोलाचीच कढी ठरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने सुद्धा प्रियांकाच्या या जागतिक पराक्रमाची दखल घेऊ नये याचेही गिर्यारोहण क्षेत्रातून विलक्षण वैष्यम्य व्यक्त होत आहे. प्रियांकाच्या या सोनेरी पराक्रमाला दातृत्वाची नक्कीच गरज आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)