लौकी गावात दोन बिबट्यांचे दर्शन

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

मंचर – आंबेगाव तालुक्‍यातील लौकी येथील राणूबाई मंदिराजवळील काळपट्टी व घोटीमळा येथे शनिवारी ग्रामस्थांना दोन बिबट्यांचे दर्शन झाले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनखात्याने बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कळंब-राणूबाई मंदिर रस्त्यावरील काळपट्टी याठिकाणी शेतकरी महेश दिनकर थोरात, शिवाजी काळे व भाऊसाहेब भूतांब्रे मेथीच्या भाजीच्या शेतीवर सायंकाळी सहाच्या सुमारास फवारणी करीत होते. त्यावेळी शेताच्या बांधावर कोणतरी गुरगुरत असल्याचा आवाज ऐकू आला. कसला आवाज येतोय? म्हणून महेश यांनी मोबाईलची बॅटरी आवाजाच्या दिशेने चालू केली असता त्यांना दिडशे फुट अंतरावर शेताच्या बांधावर चार डोळे चमकल्याचे दिसले. त्यामुळे बिबट्या असल्याची खात्री पटल्याने त्यांनी मजूरांना शेतामधून रस्त्याच्या दिशेने पळा असे सांगितले. अंधार खूप असल्यामुळे नक्‍की बिबट्याच आहेत का? याची खात्री करण्यासाठी दुचाकीची लाईट चालू केली असता मुख्य रस्त्यापासून सुमारे चारशे फुट अंतरावर दोन बिबटे इकडे-तिकडे फिरत असल्याचे त्यांना दिसले.
तसेच कळंब-राणूबाई मंदिर मार्गे शिक्षक संतोष रामचंद्र थोरात नेहमीप्रमाणे शाळेतून आपल्या घरी मधलामळा (लौकी) येथे चालले होते. त्यावेळी थोरात यांना शेताच्या बांधावर दोन बिबटे दिसले. लौकी येथे लवकरात लवकर वन विभागाने पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी सरपंच संदेश थोरात यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)