पुणे : लोहमार्ग पोलिसांच्या संकेतस्थळाचे लोकार्पण

पुणे – पुणे लोहमार्ग जिल्हा पोलीस दलाच्या नव्या संकेतस्थळाचे लोकार्पण मंगळवारी झाले. पोलीस अधीक्षक डॉ.प्रभाकर बुधवंत यांच्या शुभहस्ते ते करण्यात आले. जुने संकेतस्थळ हे संगणकावर ओपन करण्यापर्यंतच मर्यादीत होते. नूतनीकरणानंतर ते मोबाईल, टॅब, आयपॅड यासारख्या उपकरणांमध्येही ओपन केले जाऊ शकते. त्यामध्ये सायबर सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला आहे.

या संकेतस्थळावर माहितीचा अधिकार, पोलीस भरती, पोलीस दलाचे विविध उपक्रम इंग्रजी व मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे. नागरिकांचा अभिप्राय, हरवलेल्या व सापडलेल्या वस्तुंची तक्रार सिटझन अलर्ट, पोलीस स्टेशन व अधिकारी यांचा संपर्क क्रमांक, मृतदेह व हरवलेल्या व्यक्तीची माहिती पहायला मिळणार आहे. www.punerailwaypolice.gov.in असे संकेतस्थळ आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)