कामशेत – लोहमार्ग ओलांडताना मध्य रेल्वेच्या डाउन ट्रकवर मालगाडीची धडक बसून एका प्रवाशाचा मृत्यू झाला. कामशेत येथे शनिवारी (दि. 8) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
शैलवर्म ए. अमावती (वय 44, रा. ततनेरी, मेन रोड, मदुराई, तमिळनाडू) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव आहे.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 7) रोजी पहाटे सहा वाजण्याच्या पूर्वी कामशेत हद्दीमध्ये रेल्वेच्या डाउन ट्रॅकवर किलोमीटर नं. 144/38 जवळ धावत्या मालगाडी खाली सापडून शेलवर्म ए. अमावती हे गंभीर जखमी झाले, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अमावती हे कामशेतमध्ये वास्तवास असलेल्या पाहुण्यांकडे आले होते. या प्रकरणी लोहमार्ग पोलीस हवालदार एल. जी. पठाण तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)