लोहगाव विमानतळ होणार प्लॅस्टिकमुक्‍त

लोहगाव विमानतळावर यापूर्वीच प्लास्टिक मुक्त विमानतळासाठी प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत. त्यामुळेच थर्ड पार्टीच्या अहवालात लोहगाव विमानतळाचा क्रमांक आला आहे. भविष्यातही आम्ही विमानतळावरील अन्नपदार्थ आणि इतर कचऱ्याबाबत खास पुनर्वापर प्रकल्प राबविणार आहोत.
– अजयकुमार, संचालक, लोहगाव विमानतळ

पुणे: पर्यावरणपूरक विमानतळासाठी एयरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियातर्फे (एएआय) प्रयत्न करण्यात येत आहेत. यानुसार “एएआय’ने पुण्यातील लोहगाव विमानतळासह देशभरातील सोळा विमानतळे प्लॅस्टिकमुक्त म्हणून घोषित केले आहेत. परिणामी, यापुढे लोहगाव विमानतळावर स्ट्रॉ, प्लॅस्टिक प्लेट अशा एकदा वापरून टाकून देणाऱ्या प्लॅस्टिकवर बंदी असणार आहे.

क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाने याबाबत सर्व्हे केला होता. या संस्थेने देशातील 16 विमानतळे “सिंगल युझ प्लॅस्टिक फ्री’ असल्याचे नमूद केले. त्यानुसार “एएआय’ने मंगळवारी याबाबत अधिकृत घोषणा केली. यामध्ये पुणे, इंदौर, भोपाळ, अहमदाबाद, भुवनेश्वर, तिरूपती, त्रिची, विजयवाडा, देहराडून, चंदीगड, वडोदरा, मदुराई, रायपूर, विझाग, कोलकाता आणि वाराणसी यांचा समावेश आहे. विमानतळावर अनेक प्रकारे खाद्यपदार्थ व इतर कचरा साठला जातो. तो कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. याबाबतची जनजागृती सुरू करण्यात आली असून, काही विमानतळावर हा उपक्रम सुरू आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)