लोहगाव भागात तरूणींकडून वेश्‍याव्यवसाय करून घेणाऱ्या दोघांचा जामीन फेटाळला

पुणे – लोहगाव भागात तरूणींकडून वेश्‍याव्यवसाय करून घेणाऱ्या दोन परप्रांतीय व्यक्तींचा जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोने यांनी हा आदेश दिला आहे.
मनोज प्रभाकर दोहरे (वय 29) आणि भिमराव महेंद्र दोहरे (वय 20) अशी जामीन फेटाळलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही मध्य प्रदेशचे आहेत. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस नाईक सचिन कदम यांनी विमानतळ पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात दीपक ऊर्फ दीपेंद्र गोविदी प्रसाद (वय 27, रा. मध्य प्रदेश) आणि दगडू सुदाम खांदवे (लोहगाव) या दोघांवर गुन्हा दाखल आहे. दोघे अद्याप फरार आहेत. लोहगाव, पोरवाल रस्ता येथील तोरणा लॉजवर छापा टाकत पोलिसांनी दोघांना जेरबंद केले होते. या कारवाईत राज्यातील 2 आणि पश्‍चिम बंगाल येथील 2 अशा एकुण चार तरूणींची पोलिसांनी मुक्तता केली होती. या प्रकरणात दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. हे दोघे तरूणींकडून वेश्‍याव्यवसाय करून घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दोघेही परराज्यातील आहेत. जामीन मिळाल्यास फरार होण्याची अथवा पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची शक्‍यता आहे. पुन्हा अशा प्रकारचे गुन्हेही ते करू शकतात. यासाठी दोघांचा जामीन फेटाळावा, असा युक्तीवाद ऍड. पाठक यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने दोघांचा जामीन फेटाळला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)