गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप
राजुरी – राहाता तालुक्‍यातील लोहगाव येथेप्रज्ञासूर्य बहुउद्देशीय संघटना व जनता प्रतिष्ठानच्या वतीनेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी भीमोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लोहगावच्या सरपंच स्मिता चेचरे यांच्या हस्तेप्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी इयत्ता 10 व 12 वीच्या गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकेवाटप करण्यात आले. शशिकांत पठारे, स्वप्नील पठारे, प्रशांत परदेशी, दीपक तांबे, अनंत सुरडकर, महेश कांबळे, राजेंद्र लोखंडे, संतोष त्रिभुवन, नीलेश सुरडकर, सोमनाथ पगारे, शुभम बनसोडे, नीलेश भालेकर, जालिंदर नरोडे, सुनील काकडे, सचिन दुशिंग, कडूबाळ तुपे, एजाज तांबोळी, विकास दुशिंग, सोपान तांबेयांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. भाऊसाहेब चेचरे, बाबासाहेब चेचरे, उपसरपंच सुरेश चेचरे, माजी उपसरपंच सतीश गिरमे, विलास तांबे, किरण आहेर, योगेश आहेर, तात्यासाहेब तांबे, शुभम चेचरे, दीपक माघाडे, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य मधुकर अनाप उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)