लोहगड येथून महिला मुलीसह बेपत्ता!

File photo...

पवनानगर – लोहगड येथे राहत्या घरातून अशा ब्रुजेन कबीराज ही महिला बेपत्ता झाली आहे. याबाबत या महिलेचे पती ब्रुजेन कबीराज यांनी याबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगड येथून अशा ब्रुजेन कबीराज (वय 28) उंची 4 फूट अंगाने सडपातळ अंगात लाल रंगाचा कुर्ता, कानात कर्ण फुले, लाल रंगाची सॅंन्डल घातलेली, सोबत मुलगी सोनिया ब्रुजेन कबीराज (वय 9 वर्षे) उंची 3 फूट या दोन्ही राहत्या घरातून काही एक न सांगता निघून गेल्या आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या वर्णनाचे कोणी व्यक्‍ती आढल्यास लोणावळा ग्रामीण पोलीसांशी 02114 273036 या क्रमांकावर संपर्क साधावा. लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राकेश पालांडे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)