लोहगड चॅलेंजर्सने पटकविला एस. बी. पाटील चषक

चिंचवड – येथील एस. बी. पाटील शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयात क्रीडा सप्ताह आयोजित केला होता. या सप्ताहांतर्गत आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत लोहगड चॅलेंजर्स संघाने रायगड रॉयल संघाचा आठ धावांनी पराभव करत एस. बी. पाटील चषक पटकविला.

या अंतिम सामन्यात शेवटपर्यंत सामन्याच्या निकालाबाबत चुरशीचे वातावरण होते. सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद गाळवे यांच्या हस्ते विजेत्या संघाने चषक स्विकारला. यावेळी प्रा. अनुजा कामठे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी राहुल राजगुरु, कल्याणी भोंडवे, रवी द्विवेदी, रवी कुमार, स्वाती गवसणे, तुषार गाडे आदी उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन प्रदीप कासार आणि मोहीत शेवकर यांनी केले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)