लोहगड आणि विसापूर किल्ल्यावरील शिव मंदिरात अभिषेक

पवनानगर – श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी किल्ले लोहगड व विसापूर किल्ल्यावरील शिव मंदिरात श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचाच्या वतीने अभिषेक करण्यात आले. मंचाच्या वतीने अभिषेकाची गेली 18 वर्षांची प्रथा यंदाही जपण्यात आली.

शिव मंदिरात यथासांग पूजा व अभिषेक करण्यात आला. तसेच गडपायथ्याला असणाऱ्या शिवस्मारकला पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपतींचा जयघोष करण्यात आला. नुकतेच मंचाच्या पाठपुराव्यानंतर पुरातत्व विभागामार्फत विसापूर किल्ल्यावरील पावसामुळे पडलेल्या शिवमंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या ठिकाणी मंचाचे कार्यकर्ते मुकूंद तिकोणे व पाटण ग्रामस्थांच्या वतीने गेली तसेच दोन वर्षे अभिषेक करण्यात येत आहे.

शेवटच्या सोमवारी लोहगडावर लोणावळा ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. या वेळी जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचारक संदीप नेवे उपस्थित होते. जय महाराष्ट्र फ्रेंड्‌स क्‍लब तळेगाव, यशस्वी ग्रुप सुदुंबरे, निलेशभाऊ लोंढे युवा मंच नाणोली आदी शिवप्रेमी युवक उपक्रमात सहभागी झाले होते.

अभिषेकाचे नियोजन संदीप गाडे, सागर कुंभार, सचिन निंबाळकर, अनिकेत अंबेकर, विश्‍वास दौंडकर, राहुल वाघमारे, संदीप भालेकर, चेतन जोशी, अजय मयेकर, कैलास वाघमारे, चेतन बैयकर, अरुण काकडे, प्रमोद भैरवकर आदी कार्यकर्त्यांनी केले. गेली 18 वर्षे लोहगड व विसापूर किल्ल्याच्या दुर्गसंवर्धनाचे कार्य करत असल्याची माहिती मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी दिली. विसापूर किल्ल्यावर मारुती तिकोणे, कुंडलिक केदारी, बाळकृष्ण कोंढभर, पप्पु तिकोणे यांनी अभिषेक केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)