लोणी देवकर औद्योगिक वसाहतीत सुजय पॅकेजिंगचा भव्य प्रकल्प

रेडा- इंदापूर तालुक्‍यातील मौजे लोणी देवकर येथिल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत सुजय पॅकेजिंग कंपनी सुरू झाली असून, तरूणांच्या हाताला काम आणि भूमिपुत्रांना न्याय देत, हेमंत वैद्य यांनी आपल्या सुजय पॅकेजिंगची देशपातळीवर अनोखी भरारी घेतली आहे.
सुजय पॅकेजिंग कंपनीची सुरवात 1999 मध्ये करण्यात आली. या कंपनीच्या माध्यमातून टेप (चिकट) बनवणारी सर्व प्रकारची मशनरी तयार केली जातात. ही यंत्रे पूर्णत: स्वदेशी असून याची डिझाईन सुजय पॅकेजिंग करते, याची मागणी देशासह परदेशातही आहे. मलेशिया, सौदी अरेबिया, दुबई, अफ्रिका व इरोप तसेच चीनला या मशनरीची निर्यात केली जाते. मशनरींची वाढती मागणी असल्यानेच लोणी देवकर औद्योगिक वसाहतीत विस्तारीत प्रकल्प उभारला असल्याचे कंपनीचे प्रमुख हेमंत वैद्य यांनी सांगितले.
मेडीकेटेड टेप तयार करणारी ही देशातील पहिली कंपनी असल्याने या नव्या उद्योगासाठी मोठी पसंती पुढे येत आहे. याचा प्रारंभ सुजय पॅकेजिंगचा देवकर लोणी एमआयडीसी मध्ये सुजय पॅकेजिंगचे मुख्य संचालक हेमंत वैद्य व अर्पना वैघ यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी संचालिका हर्षदा वैद्य यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)