लोणी देवकर एमआयडीसीतून मती चोरी

पळसदेव- लोणी देवकर एमआयडीसी परिसरात शासकीय जमीतील लाखो रुपयांची माती व मुरूम स्थानिक गावगुंड जेसीबी व डंपरच्या साह्याने दररोज चोरून नेऊन परिसरातील जमिनीत भरत असल्याची धक्कादायक बाबा समोर आली आहे. विशेष म्हणजे येथील तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय शेजारूनच ही चोरलेली माती व मुरुमाची वाहतूक केली जात असल्याचे स्थानिक नागरिकांनी संगितले.
लोणी देवकर परिसरात गावगुंडांनी दहशत असल्याने याबाबत उघडपणे कोणी बोलण्यास अथवा तक्रार करण्याचे धाडस करीत नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून समोर आले आहे. येथील काही गावगुंडांनी या परिसरात दहशत माजून राजरोसपणे शासकीय जमिनीतील लाखो रुपयांची माती व मुरूम रात्रीच्यावेळी चोरून शेजारील गावातील नागरिकांना विकत आहेत. याबाबत अधिकाऱ्यांना कल्पना असून देखील जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी व गावगुंडांची आर्थिक तडजोड असल्यानेच हा सगळा प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचे नागरिकांनी सांगितले. सध्या या मातीवरून एमआयडीसी परिसरात अनेकदा वाद निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थतेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे, तरी या गावगुंडांना व हा प्रकार पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई, करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

  • यापूर्वी आम्ही आशा प्रकारे माती व मुरूम वाहतूक करणाऱ्यावर अगदी खड्ड्यांची लांबी-रुंदी व खोली मोजून दंड केला आहे. मात्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकाऱ्यांची जबाबदारी असताना ते आम्हाला याबाबत मदत करीत नाहीत अनेकदा बोलून पत्र देऊनही ते प्रतिसाद देत नसल्याने अधिक कार्यवाहीसाठी अडचणी येत आहेत. एमआयडीसी अधिकाऱ्यांनी बाबत दक्ष राहिल्यास आमच्याकडून स्वत्रंत पथक देऊन कारवाई करण्यात येईल.
    – श्रीकांत पाटील, तहसीलदार

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)