लोणी काळभोर- येथील नाभिक समाजाच्या वतीने संत सेना महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. येथील विठ्ठल मंदिरात झालेल्या कार्यक्रमात पहाटे विठ्ठलाच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी हभप विनोदमहाराज काळभोर यांचे कीर्तन झाले. उपस्थित नागरिकांना या निमित्ताने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी हवेली पंचायत समितीचे सदस्य युगंधर काळभोर, लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत काळभोर, उपसरपंच योगेश काळभोर, युवानेते भरत काळभोर, कुंजीरवाडीचे ग्रामपंचायत सदस्य योगेश गायकवाड उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)