लोणी काळभोरमध्ये श्री काळभैरवनाथ यात्रा सुरू

लोणी काळभोर – येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा शनिवारी (दि. 31) आणि रविवारी (दि. 1 एप्रिल) होणार असून, त्यनिमित्त विविध धार्मिक, करमणुकीचे आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री काळभैरवनाथ अंबरनाथ सर्व देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश काळभोर व अंबरनाथ देवस्थान ट्रस्टच्या उत्सव समितीचे अध्यक्ष सतीश काळभोर यांनी दिली. यात्रेनिमित्त हभप विनोद महाराज काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शनिवारी (दि. 31) पहाटे श्रींचा महामस्तकाभिषेक सोहळा होणार आहे. रात्री 9 ते 12 या वेळेत काळभैरवनाथाची पालखीतून मिरवणूक काढण्यात येणार आहे. मध्यरात्री 12 ते 3 या वेळेत छबिन्याचा कार्यक्रम होणार आहे. रविवार दि. 1 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 1 या वेळेत लावणी महोत्सव हा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. याच दिवशी दुपारी 3 वाजता निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार आहे. या आखाड्यात 25 निकाली कुस्त्या होणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)