संग्रहित फोटो

लोणी काळभोर- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत एंजल हायस्कूल, लोणी काळभोरच्या विद्यार्थ्यानी नेत्रदीपक यश मिळवले असून, सलग 11 व्या वर्षी त्यांनी शाळेच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
ओम एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेचे वाणिज्य शाखेचे 7, तर विज्ञान शाखेचे 36 असे एकूण 43 विद्यार्थी परीक्षेला बसले होते ते सर्वजण उत्तीर्ण झाले आहेत.
शाळेत प्रथम 5 क्रमांक मिळवणारे विद्यार्थी पुढीलप्रमाणे – अभिषेक लोणकर (85.2 टक्के – प्रथम), आकांक्षा काळे ( 84.15 ) द्वितीय), अपूर्वा मुळे (82.86 – तृतीय ), चतुर्थ क्रमांक – हंसराज चौधरी (78.9 – चतुर्थ), पाचवा क्रमांक – अभिषेक कुंजीर (77.2 पाचवा).
ओम एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा, संचालक परवीण इराणी, एंजल हायस्कूलचे प्राचार्य फरशीद इराणी, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य कुलकर्णी आणि व्यवस्थापक त्रिवेणी घाटे यांनी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)