लोणी काळभोरकरांचा दिवस उजाडतोय अभंगांने

लोणी काळभोर- गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली काकड आरतीची परंपरा लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विठ्ठल मंदिरात मोठ्या भक्‍तीभावाने सुरू असून दररोज पहाटे वेगवेगळ्या अभंगांच्या माध्यमातून परमेश्‍वराची प्रार्थना करण्याचे काम भाविक श्रद्धेने करीत आहेत. येथील विठ्ठल मंदिरात गेली अनेक वर्षे कोजागरी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमा असा सलग महिनाभर वैष्णवांचा उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. यावेळी वारकरी भजनी मालिका, त्यातील अभंग, गवळणी, आंधळे पांगळे, वासुदेव आदी प्रकार मोठ्या भक्‍तीभावाने केले जातात. या सर्वांचा शेवट भैरवी म्हणून केला जातो. यावेळी जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्‍वर , संत नामदेव, संत जनाबाई, संत एकनाथ आदी संतांच्या रचना वारकरी संप्रदायांच्या गोड व सुमधूर चालीत गायिल्या जातात. या गोड अभंगांच्या सुरांनी गावाला जागे करण्याचे काम दररोज पहाटे होत आहे. विनोदमहाराज काळभोर, श्रीकृष्ण महाराज बोरकर, दत्तात्रय महाराज, उत्तम खोले महाराज, महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा बेबीताई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सगळा सोहळा पार पडतो. यावेळी प्रकाश दादा काळभोर यांच्या सूत्रसंचालनामुळे वातावरणात अध्यात्मिकपणा येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)