लोणीकाळभोर महाविद्यालयाची पदकांची कमाई

लोणी काळभोर- येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयातील दोन खेळाडूंनी संस्था अंतर्गत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळवले आहे. महाविद्यालयाच्या एका खेळाडूने सुवर्ण व रौप्यपदक तर एकाने रौप्यपदक पटकावले आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर अंतर्गत शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दी निमित्त जत (जि. सांगली) येथे राजे रामराव विद्यालयात संस्था अंतर्गत क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत कला शाखा, प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या जयेश विनायक तावरे याने थाळी फेक प्रकारात सुवर्णपदक व गोळाफेकमध्ये रौप्यपदक पटकावले आहे. सुहास खंडू कोळेकर याने 800 मीटर धावणे प्रकारात रौप्यपदक पटकावले आहे. या दोन्ही खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक अमित गिरीगोसावी यांनी मार्गदर्शन केले. दोन्ही खेळाडूंनी मिळवलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, प्राचार्य डॉ. सुनीलकुमार कुरणे, विभाग प्रमुख एस. एम. गवळी, ए. बी. सुळगेकर, शारीरिक शिक्षण संचालक राजू काळभोर, प्राध्यापक, कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)