लोणीकंद पोलिसांची कारवाई : राज्य उत्पादन विभागाचे दुर्लक्ष?

वाघोली- वाडेगाव (ता. हवेली) मुळा-मुठा नदीच्या पात्रालगत बेकायदेशीर चालू असलेली हातभट्टी लोणीकंद पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने उद्‌धवस्त केली. वाढत्या नागरिकांच्या तक्रारी असताना सुद्धा दारूबंदी विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांना इतर गंभीर गुन्ह्याबरोबरच परिसरातील गावांमध्ये चालू असलेल्या बेकायदेशीर हातभट्टी, अवैध दारूविक्री आदींवर कारवाई करावी लागत आहे. बेकायदेशीर चालू असलेल्या हातभट्ट्या, दारूविक्री यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र राज्य उत्पादन शुल्क विभाग असताना देखील नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत हे काम स्थानिक पोलिसांना करावे लागत आहे. त्यामुळे महत्त्वाचे गंभीर गुन्हे, अपघात, आंदोलने, वाहतूककोंडी आदी बाबी सांभाळत दारूबंदी विभागाचीही धुरा सांभाळावी लागत आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनला नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस हवालदार बाळासाहेब गाडेकर, पोलीसनाईक चंद्रकांत माने, पोलीस. नाईक होनमाने या पथकाने बुधवारी (दि. 27) सायंकाळी वाडेगाव येथे मुळा-मुठा नदीच्या पात्रालगत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर चालू असलेल्या हातभट्टीवर धाड टाकून जेसीबीच्या सहायाने उद्‌धवस्त केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)