शिक्रापूर- लोणीकंद (ता. हवेली) येथील लोणीकंद-थेऊर या अतिमहत्त्वाच्या आणि नियमित मोठमोठ्या वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर खड्डे पडले असून रस्त्याच्या दान्हीनी बाजूंनी चाऱ्या खचल्या आहेत. येथील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून अपघातांचा धोका निर्माण झाला आहे.
लोणीकंद मार्गे थेऊर येथे जाणारा हा मुख्य रस्ता आहे. सोलापूर महामार्गाला जोडणारा हा रस्ता असल्यामुळे येथे मोठमोठ्या वाहनांची नेहमी वर्दळ असते. तसेच थेऊर हे अष्टविनायकपैकी एक तीर्थक्षेत्र असल्यामुळे पर्यटकांची देखील नेहमी या रस्त्याने वर्दळ चालू असते. या रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूने खड्डे पडले असल्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या पूर्वी अनेक अपघातदेखील या रस्त्यावर झालेले आहेत. सध्या या रस्त्याच्या कडेला मोठे खड्डे पडलेले असल्यामुळे दोन्ही बाजूने वाहने आल्यानंतर एखाद्या वाहनाला रस्त्याचे खाली वाहन घेताना मोठी अडचण निर्माण होत असून अनेक वाहनांचे नुकसान देखील होत आहे, तसेच येथील रस्ता हा निमूळता तसेच उतार मार्गावर असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खूप मोठी दुरवस्था येथील रस्त्याची होत असते. रस्त्याच्या कडेला असलेल्या चाऱ्या खचल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना मोठी कसरत करावी लागते तरी देखील प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी या भागातील नागरिक व वाहनचालक करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)