लोणीकंद गोदामातून बॅटऱ्या चोरणारी टोळी जेरबंद

वाघोली- लोणीकंद (ता.हवेली) येथील गोदामात उभ्या असलेल्या ट्रकमधून मोबाईल टॉवरच्या 59 बॅटऱ्या चोरीचा गुन्हा पुणे ग्रामीण एलसीबी टीमने उघडकीस आणून सात जणांना पोलिसांनी अटक केल्याचे एलसीबीचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी सांगितले.
लोणीकंद येथे पेट्रोल पंपाजवळ इंडस टॉवर लिमिटेड कंपनीच्या गोदामातून ट्रान्सपोर्टसाठी बॅटरीचा माल भरून उभ्या असलेल्या दोन ट्रक पैकी एका ट्रकमधून मोबाईल टॉवरच्या एक लाख 81 हजार रुपये किमतीच्या 59 बॅटऱ्या चोरून नेल्याची फिर्याद लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तो उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांच्या आदेशाने गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून चालू होता. सदर पथकाने गुन्ह्याची माहिती घेवून तपासाला सुरुवात केली. गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी जावून परिसरात वेषांतर करून फिरून माहिती घेण्यास सुरुवात केली.
या पथकास माहीती घेत असताना यापूर्वीचे रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय सुभाष कदम (वय 40 रा.उरुळीकांचन ता.हवेली), सोमनाथ उर्फ पिंटू तानाजी कांबळे (वय 27, रा.सिंहगड रोड) यांनी सदर गुन्हा केल्याची माहिती मिळाली, त्यावरून त्या दोघांना वाघोली येथून ताब्यात घेवून त्यांच्याकडे पोलीसी खाक्‍यात चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदार पप्पू उर्फ अभिजित राजू दगडे (वय 28), राहुल उर्फ दुर्गा विजय कांबळे, गौतम शिवाजी क्षीरसागर (सर्व रा. सावित्रीबाई फुले वसाहत, सिंहगड रोड, पुणे) यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. गुन्ह्यात चोरलेल्या बॅटऱ्या आकाश उर्फ सुहास नागेश गवळी (वय 26, रा. लक्ष्मी नगर, येरवडा, पुणे) व पूनाराम साकलाजी माळी (वय 65, रा.वडगाव शेरी, पुणे) यांना विकल्याचे सांगितल्याने त्यांनाही सदर गुन्ह्याच्या तपासाकरिता ताब्यात घेण्यात आले आहे. यातील रेकॉर्डवरील संजय कदम याच्यावर यापूर्वी चोरी घरफोडीचे 3 गुन्हे तसेच सोमनाथ कांबळे याच्यावर जबरी चोरीचे 3, खुनाचा प्रयत्न 2, मारामारी व इतर 11 असे एकूण 16 गुन्हे दाखल आहेत. सोमनाथ कांबळे यास यापूर्वी पुणे शहर हद्दीतून तडीपारही करण्यात आलेले आहे. अटक करण्यात आलेल्या सात जणांना लोणीकंद पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, सुनिल बांदल, मोरेश्वर इनामदार, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, रवी शिंगारे, विशाल साळुंखे, समाधान नाईकनवरे यांनी महत्वाची कामगिरी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)