लोणीकंदची शाळा ठरली “राष्ट्रीय आदर्श शाळा’

वाघोली- महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र आयोजित राज्यस्तरीय शिक्षण परिषद पुरस्कार सोहळ्यात लोणीकंद (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला राष्ट्रीय आदर्श शाळा पुरस्कार 2018 राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते व शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस प्रविण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आला
लोणीकंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच, शाळेतील माया लंघे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी लोणीकंदचे आदर्श सरपंच श्रीकांत कंद, अनिल होले, उपसरपंच रविंद्र कंद, सदस्या संगीता शिंदे, राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस राहुल शिंदे, मा. सरचिटणीस विशाल कंद, संतोष झुरुंगे, विनायक भोर, सुधीर कंद, नितीन शिंदे, जयआप्पा कंद, दिनेश शिंदे, किरण होले यांच्यासह शिक्षक वृंद, आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)