लोणावळ्यात वाहतूक पोलिसांना मारहाण करणाऱ्या तिघांना अटक

लोणावळा, (वार्ताहर) – गाडी “यू टर्न’ करण्यास मनाई केल्याच्या कारणावरून ठाण्यातील तीन युवकांनी पोलिसांसोबत हुज्जत घालत एका वाहतूक पोलीस व वॉर्डन यांना हातांनी व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार लोणावळ्यातील गवळीवाडा चौकात शनिवारी (दि. 24) सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी तीन जणांना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय अनिल गावडे (वय 24, रा. सावरकर नगर, ठाणे), प्रतीक साईनाथ पाटील (वय 28, रा. बालकुंभ महालक्ष्मीनगर, ठाणे), दया माणिक पाटील (वय 23, रा. पाटीलवाडी, ठाणे) अशी वाहतूक पोलिसांना मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत.

लोणावळ्यात शनिवारी सुट्ट्यांमुळे वाहनांची मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच वेहरगाव-कार्ला गडावर एकविरा देवीच्या चैत्री यात्रेच्या पालखी सोहळा व देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या ठाणे, मुंबई, रायगड व कोकण भागातील भाविकांच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्याने लोणावळ्यात दिवसभर वाहतूक कोंडी होती. सायंकाळच्या सुमारास गवळीवाडा येथील मिनू गॅरेज चौकात “नो-यु टर्न’च्या जागी एक कार चालक “टर्न’ घेत होता.
चौकातील वाहतूक पोलीस चंद्रकांत सुभाष गव्हाणे (वय 26) यांनी त्याला “यु टर्न’ न घेता गाडी पुढे घेऊन जाण्याची सूचना केली असता. गाडी पुढे न घेता त्यांनी गाडीतून उतरून वाहतूक पोलिसांच्या सोबत हुज्जत घालण्यास व शिविगाळ करण्यास सुरुवात केली. या वेळी गाडीतून उतरलेले अक्षय गावडे, साईनाथ पाटील व दया पाटील यांनी वाहतूक पोलीस गव्हाणे याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

तसेच घटनास्थळी आलेले वॉर्डन मारुती आंबेकर यांना हाताने व लाथाबुक्कयांनी मारहाण करत होते. यावेळी जवळच असलेल्या रिक्षा चालक आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत भांडणे मिटवण्यास पोलिसांना मारहाण करणाऱ्या तिघांना चांगलाच चोप देत त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. लोणावळा पोलिसांनी पोलिसांना मारहाण व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तिघांनाही ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी लोणावळा शहराचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली युवराज बनसोडे तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)