लोणावळ्यात दोन मुले बुडाली

लोणावळा – लोणावळा नगर परिषदेच्या वरसोली कचरा डेपोवर पाणी साठवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली. कचरा डेपोवर कचरा वेचक म्हणून काम करणारी ही दोन्ही मुले सकाळी कचरा डेपोमध्ये गेली असता पाय घसरून पाण्यात पडल्याचे सांगण्यात येत आहे.

इम्रान उर्फ सोनू रफिक शेख (वय 14) आणि अस्लम इस्माईल मुजावर (वय 16, दोघेही रा. वाकसई, मूळ गाव उद्‌गीर) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत. ते दोघेही मावसभाऊ आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोनू याचे वडील रफिक शेख हे कचरा डेपोमध्ये कॉन्ट्रॅक्‍टमध्ये कचरा उचलण्याचे काम करतात आणि डेपोच्या बाजूलाच असलेल्या वाकसई चाळ येथे राहतात. दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या मेव्हणीचा मुलगा अस्लम त्यांच्यासोबत लोणावळ्यात आला होता. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे सोनू आणि अस्लम कचरा डेपोमध्ये गेले होते.

इम्रान उर्फ सोनू याचा मृतदेह लगेच सापडला; परंतु अस्लमचा मृतदेह बराच वेळ सापडत नव्हता. अखेर अस्लम याला शोधण्यासाठी स्थानिक शिवदुर्ग मित्र बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी अस्लमचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले. शोधकार्यात शिवदुर्गचे प्रविण देशमुख, अजय शेलार, सागर कुंभार, राजेंद्र कडू, आनंद गावडे, रोहित वर्तक, सागर पडवळ, दिनेश पवार, सुनिल गायकवाड व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)