लोणावळ्यात अनोळखी तरुणाचा गळफास घेऊन आत्महत्या

लोणावळा – येथील “टाटा पॉवर हाऊस’च्या हद्दीमध्ये भुशी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत 200 मीटर अंतरावर एक अनोळखी व्यक्‍तीने नायलॉन दोरीच्या साहाय्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळाली. या आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झाले नसून, या व्यक्‍तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे. या व्यक्‍तीचे अंदाजे 35 ते 40 वर्ष असून, रंगाने गोरा, मजबूत शरीरयष्टी, डोक्‍यावर केस नसून, उंची 5 फूट 7 इंच आहे. निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आणि पांढऱ्या रंगाचे काळ्या चौकटी असलेले शर्ट अंगावर परिधान केलेले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वरील वर्णनाच्या व्यक्तीबद्दल कोणास काही माहिती असल्यास त्यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यामध्ये संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)