लोणावळ्यातील 21 झाडांवर कुऱ्हाड!

  • वृक्ष तोडण्यापूर्वी नगरपरिषदेने मागितल्या हरकती

लोणावळा – लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीतील शहरासह तुंगाली, खंडाळा परिसरातील वेगवेगळ्या 21 प्रकारच्या झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार आहेत. वृक्ष तोडण्यासाठी नगरपरिषदेने नागरिकांकडून हरकती मागविल्या असून, आठवड्याभरात नगरपरिषदेकडे लेखी कळविण्याचे नोटीसीद्वारे स्पष्ट केले आहे.

नगरपरिषदेकडून शहर आणि परिसरातील वेगवेगळ्या 10 ठिकाणी असलेल्या धोकादायक 21 झाडे तोडण्याची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये आगवली चाळ येथील हरिणाम सोसायटीमध्ये रबराच्या झाडाची मुळे संरक्षण भिंतीमध्ये घुसल्यामुळे ते रस्त्यावर पडून अपघात होऊ शकतो. तुंगार्ली येथील कानजी वसनजी सेनोटोरियमजवळ जांभळाच्या झाडाच्या खोडाला कीड लागली आहे. जांभळाचे झाड पोकळ झाले असून, ते कोणत्याही क्षणी एका बंगल्यावर पडून अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गाजवळील कुमार हॉटेलसमोर रेनट्री झाडाला वाळवी लागल्यामुळे ते पूर्णपणे सुकले असून ते रस्त्यावर पडण्याची भीती आहे. तुंगार्ली येथील सर्व्हे नं. 93/2 पार्ट प्लॉट नं 214 व 215 बिल्डिंग बी, हाऊस क्रमांक 5 येथील गुलमोहर झाड पूर्णपणे वाळलेल्या स्थितीमध्ये असल्यामुळे ते बंगल्यावर पडून अपघात होईल. आकाशाचे झाडाला वाळवी लागल्यामुळे ते पूर्णपणे सुकलेले आहे. हे झाडा फोटोफोन बंगला, रायवूड येथे आहे. बिजेस हॉटेलच्या आवारात एक सुरूचे आणि दोन रबर अशा तीन झाडांना वाळवी लागल्यामुळे ते पडून अपघात होण्याची शक्‍यता वाढली आहे.

सर्व्हे क्रमांक 43, बंगला अंबरवाडी, बी. वॉर्ड येथे एक जंगली झाड सुरक्षा भिंतीवर पूर्णपणे वाकलेले असल्यामुळे ते रस्त्यावर पडून अपघात होऊ शकतो, असे नगरपरिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व्हे नं. 20, शहाणी रोड येथे प्रस्तावित मंजूर इमारतीच्या बांधकामात अडथळा निर्माण होत असल्यामुळे आंबा, लिची, दोन जंगली झाडे, एक सीता अशोका, तीन जाम आणि चिक्‍कू अशी नऊ झाडे असून, ही तोडण्याकरिता निविदा प्रसिद्ध केली आहे.

खंडाळा येथील बॅंक ऑफ इंडिया, निर्धार हॉलिडे होम येथे पूर्णपणे सुकलेले जंगली झाडपडून अपघाताची शक्‍यता निर्माण झाली आहे. खोंडगेवाडी येथे कदम्ब, फायकर्स ही दोन झाड पूर्णपणे वाकलेल्या अवस्थेत असल्यामुळे ते पडून अपघातची शक्‍यता वाढली आहे. यासंदर्भात नागरिकांकडून पुढील सात दिवसांत हरकती नोंदविण्याचे आवाहन नगरपरिषदेने केले आहे. अर्थातच नगरपरिषद हद्‌दीतील 21 झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार आहे. नागरिकांनी नगरपरिषदेकडे वेळेत हरकती न नोंदविल्यास अन्य हरकतींचा विचार केला जाणार नाही, असेही निविदेद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)