लोणावळ्यातील “वॅक्‍स म्युझियम’मध्ये “सचिन तेंडुलकर’चा पुतळा

लोणावळा – क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मेणाचा पुतळा भारतातील पहिले “वॅक्‍स म्युझियम’चा मान असलेल्या लोणावळ्यातील “सुनील्स सेलिब्रिटी वॅक्‍स म्युझियम’मध्ये ठेवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये एका दिमाखदार सोहळ्यात या पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले होते. त्यानंतर आता दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हा पुतळा म्युझियममध्ये नागरिकांना पाहण्याकरिता खुला करण्यात आला आहे.

जगभरातील क्रिकेट प्रेमींचे प्रमुख आकर्षण असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा हा पुतळा वॅक्‍स कलावंत सुनील कंडलूर यांनी साकारला आहे. लवकरच कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी व विक्रमवीर विराट कोहली यांचेही मेणाचे पुतळे म्युझियममध्ये ठेवण्यात येणार असल्याचे कंडलूर यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुनील कंडलूर यांनी लंडन येथील मादाम तुँसा या वॅक्‍स संग्रहालयाच्या धर्तीवर भारतातील पहिले जागतिक दर्जाचे वॅक्‍स म्युझियम लोणावळा शहरात सुरू केली आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह देशभरातील विविध महापुरुषांचे तसेच राजकारणातील प्रमुख मंडळी, सिनेसृष्टीतील कलाकार, नामवंत खेळाडू अशा शंभरहून अधिक सेलिब्रिटींचे हुबेहूब मेणाचे पुतळे या संग्रहालयामध्ये बनवण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)