लोणावळा – लोणावळ्यातील रायवूड उद्यान परिसरातील वनराई सोसायटी येथील एका जांभळीच्या झाडाखाली एक दोन दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक आढळल्याने लोणावळ्यात खळबळ उडाली आहे. शनिवारी (दि. 26) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ही घटना उघडीस आली.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनराई सोसायटीच्या कोहिनूर व्हिला येथे माळीकाम करणाऱ्या सीताबाई शांताराम मानकर (वय 50) यांना येथील एका जांभळीच्या झाडाखाली एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. सिताबाईंनी त्या आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता, त्यांना त्या जांभळाच्या झाडाखाली एक दोन दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक आढळले.

याबाबत सिताबाईंनी तत्काळ लोणावळा शहर पोलिसांना खबर देत माहिती दिली. माहिती कळताच लोणावळा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करत त्या बालिकेला ताब्यात घेतले. उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. बालिकेची तब्येत उत्तम असून, तिला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात रवाना केले. लोणावळा शहर पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)