लोणावळ्यातील चित्रकारांनी साकारलेल्या रांगोळीचे प्रदर्शन

लोणावळा – लोणावळा शहरातील आर्टिस्ट ग्रुपच्या कलाकारांनी दीपावलीच्या निमित्त नगरपरिषदेच्या आवारात साकारलेल्या दर्जेदार रांगोळ्यांनी लोणावळेकरांची मने जिंकली आहे. रांगोळ्यांचे प्रदर्शन पहाण्यासाठी लोणावळा शहर व परिसरातील नागरिक गर्दी करीत आहे.

मागील काही वर्षांपासून लोणावळा शहर व परिसरातील हौशी चित्रकारांच्या वतीने दिपावलीनिमित्त रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात येत होते. मात्र मागील आठ वर्षांपासून रांगोळी प्रदर्शनासाठी आवश्‍यक असलेल्या जागे अभावी रांगोळी प्रदर्शन होऊ शकले नव्हते. यावर्षी लोणावळा नगरपालिकेची प्रशस्त नवीन इमारत पूर्ण झाल्याने रांगोळी प्रदर्शनाच्या जागेचा प्रश्‍न मिटला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोणावळा नगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान मोहिमेत योगदान देणाऱ्या लोणावळ्यातील कलाकारांच्या कलेला लोणावळा नगरपालिकेने नेहमीच प्रोत्साहन देत असते. लोणावळा नगरपालिकेने यावर्षी रांगोळी प्रदर्शनासाठी पालिकेच्या पहिल्या मजल्यावरील जागा उपलब्ध करून देत कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन दिले.

या प्रदर्शनाचे उद्‌घाटन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, नगरसेवक राजू बच्चे, देविदास कडू, निखिल कवीश्‍वर, ब्रिंदा गणात्रा, रचना सीनकर, अपर्णा बुटाला, मंदा सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड आदींसह कलाकार उपस्थित होते. हे प्रदर्शन 8 नोव्हेंबरपर्यॅंत सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत पाहावयास मिळणार आहे.

या प्रदर्शनात ज्येष्ठ चित्रकार दत्ता थोरात व शिरीष बडेकर यांनी निसर्ग चित्रे, किशोर बनसोडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, बंडू येवले यांनी संत तुकाराम, प्रमोद पांचाळ, ऋषिकेश लेंडघर, सचिन कुटे, सागर तावरे, चंद्रकांत जोशी, संजय गोळपकर, रमेश बोंद्रे, सुनील बोके, प्रमोद कुटे व पूजा दासगुप्ता यांनी विविध स्त्री चित्रे तसेच अनुपम गुप्ता यांनी बाहुबली, समीर पिसे यांनी ऋषी कपूर, नितीन तिकोणे यांनी छत्रपती शिवाजी व संभाजी महाराज, गोपाळ विंचूरकर यांनी भव्य गालिचा, धनंजय होन्नंगी यांनी आदिवासी पुरुष व्यक्तीरेखा रांगोळीच्या माध्यमातून उत्तम साकारली असून, सुशील दासगुप्ता, दिलीप मानकामे, इकबालभाई, ज्योती दासगुप्ता, ईशान दासगुप्ता या कलाकारांनीही विविध विषयावर रांगोळ्या साकारल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)