लोणावळा युवक कॉंग्रेसच्या वतीने “कॅन्डल मार्च’

लोणावळा – कठवा व उन्नाव या दोन वेगवेगळ्या ठिकाणी अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध नोंदविण्याकरिता लोणावळा शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने नुकताच मावळा पुतळा चौक ते शिवाजी महाराज चौक दरम्यान “कॅन्डल मार्च’चे आयोजन केले होते.

देशभरात महिलांवर वाढत असलेले अत्याचार रोखण्यासोबत नराधमांना तातडीने फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. भाजपा सरकारच्या काळात महिला अत्याचाराच्या घटना दिवसगणिक वाढत असताना त्या रोखण्यात सरकारला मात्र अपयश आले असल्याने या मार्चच्या समारोप प्रसंगी भाजपा सरकारचा देखील निषेध नोंदविण्यात आला.

कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, माऊली दाभाडे, प्रांतिक सदस्य दत्तात्रय गवळी, महिलाध्यक्षा वैशाली चिंतामणी, नगरसेवक निखिल कविश्‍वर, आरोही तळेगावकर, संध्या खंडेलवाल, सुवर्णा अकोलकर, सुबोध खंडेलवाल, उमेश तळेगावकर, फिरोज बागवान, फिरोज शेख, युवक अध्यक्ष शिवराज मावकर, बाबुभाई शेख, सुनील मोगरे आदीसह महिला व युवक मोठ्या संख्येने या मार्चमध्ये सहभागी झाले होते.

अत्याचार हा कोणत्या जाती धर्माच्या महिलेवर झाला याचा विचार न करता नराधमांना फाशीवर लटकवले जावे, महिलांना निर्भयपणाने फिरता यावे, असे वातावरण निर्माण करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)