लोणावळा-पौड महामार्गाचे डबके

कुसगाव बुद्रुक – लोणावळा पौड महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हद्दीत हा रस्ता येत असून लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे दुर्लक्ष केले आहे.

या रस्त्यावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम खात्याने बुजवले आहेत. खड्डे सरसकट न बुजवता नुसती मलमपट्टी केली आहे. रस्त्याच्या मधोमध खड्डे बुजवले असून रस्त्याच्या कडेचे खड्डे तसेच ठेवले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचले असून हा रस्ता जणू काही डबकेच झाला आहे. डबक्‍यातील पाणी अंगावर उडून लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे या महामार्गावरील गटारींचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. खड्डे बुजवण्याचे काम मुरूम आणि खडीने केले आहे. तेही व्यवस्थित न केल्यामुळे गाड्या घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्या लोकांना ही खडी उडून दुखापत होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे यावर्षीही रस्त्याला नदीचे स्वरूप येण्याची शक्‍यता आहे. हा रस्ता खड्डेमुक्‍त करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरीक करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)