लोणावळा-पुणे लोकलची सकाळची वेळ बदलली

पुणे – सातत्याने प्रवाशांकडून होणाऱ्या वाढत्या मागणीचा विचार करुन लोणावळा-पुणे (99805) लोकलच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. हा बदल तीन महिन्यांसाठी करण्यात आला आहे. नव्या वेळेनुसार, लोणावळ्याहून सकाळी 7.25 वाजता लोकल सुटणार असून 8.50 वाजता ती पुणे स्थानकावर दाखल होणार आहे.

लोणावळ्याहून पुण्याला सकाळच्या वेळेत येणारी लोकल ही सकाळी 9.00 वाजण्याच्या आत पुणे स्थानकावर दाखल व्हावी, अशी मागणी प्रवाशांसह विविध प्रवासी संघटनांनी केली होती. या मागणीचा विचार करून वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून (दि.24) याची अंमलबजावणी करण्यात येणार असून पुढील तीन महिने प्रायोगिक तत्त्वावर हा बदल असणार आहे.

लोणावळ्याहून सकाळी 7 वाजून 25 मिनिटांनी सुटलेली लोकल मळवली येथे सकाळी 7.34, कामशेत 7.41, कान्हे 7.45, वडगाव 7.49, तळेगाव 7.54, घोरावडी 7.58, बेगडेवाडी 8.01, देहूरोड 8.05, आकुर्डी 8.10, चिंचवड 8.14, पिंपरी 8.18, कासारवाडी 8.22, दापोडी 8.26, खडकी 8.31 व शिवाजीनगरला सकाळी 8.37 वाजता पोहोचेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)