लोणावळा परिसरातील दोन वेगवेगळ्या घटनांत तिघांचा बुडून मृत्यू

  • मृतांमध्ये चौदा वर्षांच्या मुलीचा आणि 15 वर्षांच्या मुलाचा समावेश

लोणावळा – लोणावळा शहर आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांत तीन जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पहिल्या घटनेत एका युवकाचा मृत्यू झाला, तर दुसरी घटना वलवण धरणाच्या पाण्यात घडली. या घटनेत चौदा वर्षांच्या मुलगी आणि 15 वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवना धरणाच्या “बॅक वॉटर’ला आंबेगाव परिसरात वर्गमित्रांसह पर्यटनासाठी आलेला शुभम बारीकराव वसेकर (वय 21, रा. चऱ्होली, ता. हवेली, जि. पुणे) वर्गमित्रांसमावेत पर्यटनासाठी पवनाधरण परिसरात आला. शुभम आपल्या 5 ते 6 शालेय मित्रांसोबत “गेटटुगेदर सेलिब्रिट’ करण्यासाठी आला होता. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास पोहण्यासाठी पाण्यात उतरला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत अजय कृष्णा खांडेकर (वय 21, रा. दिघी, पुणे) याने फिर्याद दिली.

लोणावळा शहरातील वलवण धरणात दुसरी घटना घडली. नातेवाईकांसोबत आलेला मोईज साजिद खान (वय 15, रा. कोंढवा, पुणे) आणि कुटुंबियांसोबत आलेली खुशी समीर शेख (वय 14, रा. लोणावळा) असे दोघेही पाण्यात बुडाले. मोईज हा चार दिवसांपूर्वी लोणावळ्यातील आपल्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी आला होता. तो सोमवारी (दि. 23) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वलवण धरणाच्या मागील बाजूला नातेवाईकांच्या सोबत फिरण्यासाठी गेला. त्या ठिकाणी तो आणि खुशी हे इतरांसोबत पाण्यात उतरले. दोघांनाही पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले.

घटनास्थळावर स्थानिकांच्या मदतीने मोईज आणि खुशी यांना पाण्याच्या बाहेर काढून लोणावळ्यातील परमार हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी के. एस. रसीवाला (वय 64, रा. हुडको कॉलनी, लोणावळा) यांनी लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी लोणावळा पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)