लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता रॅली आणि पर्यावरण मित्र शपथविधी

लोणावळा – “स्वच्छ सर्वेक्षण 2019′ अंतर्गत लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने लोणावळा शहरामध्ये शालेय मुलांच्या स्वच्छता रॅलीचे तसेच पर्यावरण मित्र प्रतिज्ञा समारोहाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये थोडक्‍यात हुकलेला क्रमांक यंदा स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत घेण्यात येणाऱ्या स्वच्छ शहर स्पर्धेत प्राप्त करायचाच या उद्देशाने मैदानात उतरलेल्या लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून बुधवारी (दि. 26) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शालेय मुलांची स्वच्छता रॅली संपूर्ण शहरातून काढण्यात आली. या रॅली दरम्यान सहभागी विद्यार्थ्यांनी स्वच्छते संदर्भात संदेश देणारे फलक हातात घेऊन घोषणा देत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोणावळा शहराच्या तुंगार्ली, खंडाळा, भांगरवाडी, गावठाण या भागातून निघालेल्या रॅलीचा समारोप पंडित नेहरू विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला. समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांना पर्यावरण मित्र म्हणून काम करण्याची प्रतिज्ञा देण्यात आली. या वेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, सभापती बिंद्रा गणात्रा, पूजा गायकवाड आदींसह विविध शाळांच्या मुख्याध्यापकांसह मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)